अमोल कैलास शिंदे

अमोल कैलास शिंदे

[ शिवार फ्लॉवर्स ( होलसेल फुलांचे व्यापारी ), गीतानगर ] सुरवातीच्या काळात माझा नवीनच व्यवसाय सुरू असताना माझ्या मित्राकडून गुरुकृपा अर्बन को. क्रेडिट सोसायटी बद्दल माहिती मिळाली. मला आर्थिक गरज असल्याने मी वेळ न लावता संस्थेच्या पत्यावर पोहाचलो. संस्थेत गेल्यावर मला वाटले आधी जसा मी दुसर्‍या संस्थेच्या वाईट अनुभव घेतला आहे इथेही तीच पध्दत असेल. परंतु इथे वस्तुस्थिति काही वेगळीच होती,गुरुकृपा अर्बन संस्थेत आल्याबरोबर सर्वात आधी पाणी देत, विचारपूस केल्यावर जनसंपर्क अधिकारी सरांनी मला हवी असलेली माहिती एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितली. त्यानंतर माझी अध्यक्ष सरांशी भेटण्याची इच्छा ही पूर्ण करत, अध्यक्ष सरांनी ही मला व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. सहसा दुसर्‍या संस्थांमध्ये अध्यक्ष सर सापडणे दुर्मिळच. पण येथे अध्यक्ष सर दररोज हजर राहतात आणि सर्व कामकाजामध्ये आवर्जून सहभाग घेता हे मला फारच विशेष वाटले. संपूर्ण कर्मचार्‍यांचं अंतर्गत वातावरण अतिशय खेळीमेलीचे होते व सर्वांचा मुक्तपणे वावर होता. माझ्या कागदपत्रे तपासणी झाल्यावर खूपच कमी कालावधी मध्ये माझ्या कर्जाची मंजूरी मिळाली जी की दुसर्‍या संस्थांपेक्षा फार कमी कालावधी होता आणि मागच्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित मला संस्थेचे आर्थिक सहकार्य लाभते आणि मीही नियमित वेळेवर परतफेड करतो. असे माझे आणि संस्थेचे एक वेगळेच परिवारासारखे आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे जे के चिरकाळ टिकून राहो. त्याबद्दल गुरुकृपा अर्बन परिवाराच मी मनस्वी आभार आहे.असेच सहकार्य पुढेही लाभत राहो हीच अपेक्षा.